Home गडचिरोली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल – महेंद्र ब्राह्मणवाडे...

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन

0
107

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि गुरुकुल अकॅडमी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोलीस भरती लेखी परीक्षा महास्पर्धेचे आयोजन दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडांगण, गडचिरोली येथे करण्यात आले. या सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून 2,000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, उद्घाटक म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रा. राजेश कात्रटवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, गौरव येनप्रेड्डीवार, गुरुकुल अकॅडमीचे संचालक पुष्पक सेलोकर, तसेच अनुप कोहळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजचा काळ स्पर्धेचा आहे. तरुणांनी परिस्थितीचे भान ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.” असे प्रतिपादन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार दूधबावरे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी व गुरुकुल अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!