Home चंद्रपूर गोंडपिपरी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातून पोषक जीवनशैलीचा संदेश – गोंडपिपरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातून पोषक जीवनशैलीचा संदेश – गोंडपिपरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
148

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातून पोषक जीवनशैलीचा संदेश – गोंडपिपरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

 

गोंडपिपरी (ता.प्र.):महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने तालुका गोंडपिपरी अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त एक जनजागृतीपर कार्यक्रम पं.स. गोंडपिपरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश देशातील कुपोषण निर्मूलन, ॲनिमिया कमी करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविणे हा होता. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी लठ्ठपणा टाळण्यासाठी व्यायामाचे महत्त्व, शारीरिक व परिसर स्वच्छतेचे फायदे, तंबाखू व व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी पौष्टिक आहार, मासिक पाळी स्वच्छता, गरोदर महिलांच्या आहारातील आवश्यक बदल आणि गर्भावस्थेतील आरोग्यविषयक काळजी यावर सविस्तर माहिती देण्यात आली.

आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या वतीने या प्रसंगी अंगणवाडी सेविकांना पुनर्वापर करता येणारे (Reusable) सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले, ज्यामुळे महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्य संवर्धनाला चालना मिळाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. वैष्णवी अमर बोडलावार, जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी संजय पूप्पलवार साहेब, CDPO लाडे सर, धाबा PHC चे वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड सर, विठ्लवाडा-भंगाराम तळोधीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका मेश्राम मॅडम, धाबा-तोहगाव क्षेत्राच्या जवळे मॅडम तसेच बिरला फाउंडेशनचे प्रतिनिधी चूनारकर हे मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाला तालुक्यातील विविध गावांमधील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या माध्यमातून “सुदृढ महिला म्हणजे सशक्त कुटुंब आणि सक्षम समाज” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!