Home गडचिरोली श्री सद्गगुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा चपराळा...

श्री सद्गगुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा चपराळा अभयारण्यमध्ये अभ्यास दौरा

0
142

श्री सद्गगुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा चपराळा अभयारण्यमध्ये अभ्यास दौरा

वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अपर्णा मारगोनवार यांचा स्तुत्य उपक्रम

 

चामोर्शी, सुखसागर झाडे श्री. सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथील वनस्पतिशास्त्र विभागामार्फत शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. बीएससी प्रथम द्वितीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा चपराळा अभयारण्यामध्ये प्राचार्य डॉ. देवेंद्र माटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ अपर्णा मारगोनवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
सदर शैक्षणिक दौऱ्याच्या माध्यमातून चपराळा अभयारण्यामधील वनस्पतीची जैवविविधता दुर्मिळ वनस्पती चा अभ्यास करण्यात आला. विधार्थ्याना नुसत पुस्तकी ज्ञाना बरोबर प्रात्यक्षिकतेची सांगळ घातली की, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञानार्जन करता येते,वनस्पतीशास्ञाच्या तज्ञ अभ्यासक, प्रोफेसर डॉ.अर्पणा मारगोनवार या दरवर्षी विधार्थ्यांकरीता विविध क्षेञभेट अभ्यास दौरा सहलीचे आयोजन करीत मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे गतवर्षी चपराळा अभयारण्यामध्ये असलेल्या विविध प्रजाती चे वनस्पती सफेद मुसळी, काळी मुसळी, जंगली लसुन, जंगली हळद, दोन प्रकारचे रान कांदा, तीन प्रकारचे रानमटाळू, देवधान, विविध प्रकारचे गवत अशा १७५ पेक्षा अधिक जाती प्रजातीच्या वनस्पतीची ओळख करून देण्यात आली.
या अभ्यास दौऱ्यामध्ये मा. सचिन शिंदे विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, मा . बापू येडे विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण चंद्रपूर, या. एम एम बाळापुरे उपविभागीय वन अधिकारी वन्य जीव आलापल्ली, मा. जी एम लांडगे वनक्षेत्र अधिकारी चौडमपल्ली, वनस्पती शास्त्राचे विशेष तज्ञ म्हणून महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील सहयोगी प्राध्यापक डॉ वसंत काहडकर, जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ उमाकांत देशमुख, श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय आष्टी येथील प्रोफेसर डॉ अपर्णा मारगोनवार , यांनी विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन केले. या अभ्यास दौऱ्यात प्राध्यापक डॉ.बी.व्ही.धोटे, दादाजी कुरसंगे व वनविभागाचे कर्मचारी , विद्यार्थ्यांनी दौऱ्यात भाग घेतला सदर दौऱ्यामध्ये भाग घेणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना वनविभागाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!