Home गडचिरोली तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यझान अयाझ शेख व शुभ्र सारंगधर बसारकर...

तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यझान अयाझ शेख व शुभ्र सारंगधर बसारकर कराटेविर तालुक्यातून प्रथम

0
202

तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यझान अयाझ शेख व शुभ्र सारंगधर बसारकर कराटेविर तालुक्यातून प्रथम

डिस्नीलॅण्ड ॲन्ड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडियम स्कूल च्या शिरपेचात विक्रमी बहुमानाचा रोवीला मानाचा तुरा

 

चामोर्शी, सुखसागर झाडे
क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र शासन पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारा आयोजित तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चामोर्शी तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल येथे सुरू असलेल्या क्रिडा स्पर्धेत डिस्नीलॅण्ड ॲन्ड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडियम स्कूल चामोर्शी येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी नामे १यझान अयाझ शेख यांनी १४ ते १९ (मुले) व शुभ्र सारंगधर बसारकर (मुली) या गटातून कराटे स्पर्धेमध्ये या दोन्ही विर बहादरांनी उत्कृष्ट पराक्रमी लढत लढवुन विक्रमाचा सर पार करीत कराटे स्पर्धेत चामोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. व त्यांची जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेकरीता निवड झाली आहे. सदर दोन्ही कराटे विर बहादरानी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील व शाळेचे मुख्याध्यापक जे. विलास सर व कराटे प्रशिक्षक मार्गदर्शक यांना दिले आहे. विजेता स्पर्धकांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही विर कराटे पटूंचे शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक जे. विलास यांनी व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!