एक गाव एक वाचनालय पोलीस विभागामार्फत स्तुत्य उपक्रम
गडचिरोली पोलीस दलाच्या ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
अतिदुर्गम भागातही दीप प्रज्वलित होणार…
गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली पोलीस दलाकडून अतिदुर्गम भागातील मौजा जिजगाव (पोस्टे मन्नेराजाराम हद्दी) येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पार पडला.
सदर गावातून ग्रंथदिंडी सह राष्ट्रध्वज फडकवित लोक जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला या अशा उल्लेखनीय उपक्रमामुळे दुर्गम भागात ज्ञानाचा नवा उत्सव!
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता
सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुषांना ज्ञान व कौशल्य विकासाची संधी
दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
एक गाव, एक वाचनालय” उपक्रम गडचिरोलीसाठी नवा परिवर्तनाचा मार्ग ठरत आहे.









