Home गडचिरोली चामोर्शी शहरासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी द्या..!

चामोर्शी शहरासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी द्या..!

0
159

चामोर्शी शहरासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी द्या..!

शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम यांची मागणी

चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी साजा येथील गेल्या काही महिन्यापासून येथील ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी) यांचे स्थानांतर झाल्यामुळे येथे पद रिक्त असुन सदर साज्याचा पदभार हा मार्कंडा देव येथील तलाठी चंदनखेडे यांचेकडे प्रभार दिला गेला. मात्र दोन्ही साज्याचा विस्तार मोठा असल्याने दोन साज्याचा पदभार सांभाळताना महसूल अधिकारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना ७/१२ तसेच अनेक आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी जाचकत्रास सहन करावा लागत आहे. साज्यावर हेलपाटे मारावे लागत आहे.
त्यासाठी येथे स्वतंत्र तलाठी द्यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष तालुका चामोर्शी गटप्रमुख सुरज नैताम यांनी मागणी केली आहे.
चामोर्शी येथील ग्राम महसूल अधिकारी मेश्राम यांची बदली झाल्याने त्यांचे रिक्त जागी नव्याने तलाठी न देता मार्कंडा देव येथील चंदनखेडे यांचेकडे प्रभार देण्यात आले असून त्यांना दोन्ही ठिकाणचे काम करतांना दमछाक होत असून हे चामोर्शी साजा हा शहर तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून तलाठ्याना गावाची पीक पाहणी करणे, जमिनीच्या नोंदी ठेवणे, शासनाचे विविध आदेश आणि निर्णय गाव पातळीवर पोहोचवणे, लोकांना मदत करणे आणि शासनासाठी गाव पातळीवर काम करणे ,समाविष्ट असून तलाठी गावातील जमिनीच्या नोंद, पिकांच्या नोंदीनी आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत ठेवने शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून तलाठी शासनाचे परिपत्रक सूचना आणि निर्णय गावकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि गावकऱ्यांच्य समस्या शासनापर्यंत पोहोचवन्याचे काम असून गावातील विविध कर गोळा करण्याचे काम तलाठी करत असतो तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा वेळोवेळी उत्पन्न व रहिवाशी दाखला, तर शेतकऱ्यांना सात बारा, सह विविध कागदपत्रे यांची आवश्यकतेनुसार वेळोवेळी जुळवाजुळव करावे लागते. सदर चामोर्शी साजाला स्वंतत्र ग्राम महसूल अधिकारी देण्यात यावा .
अशी मागणी शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष तालुका चामोर्शी गट प्रमुख सुरज नैताम चामोर्शी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!