Home गडचिरोली खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली...

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

0
228

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

 

सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्ह्यातील विविध माओवादी दंगली मध्ये सक्रिय सहभाग असलेल्या माओवाद्यास अखेर अटक करण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्याचा माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग होता.

सन 2024 मध्ये पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी पेरमिली दलममध्ये राहून करत होता सदस्य पदावर काम करीत असल्याचे गोपनिय सूत्रांची माहिती होती. परंतु पेरमली दलम संपूष्टात आल्याने मोठ्या शिताफीने तो तिथून तेलंगणा राज्यामधील हैद्राबाद येथे फरार झाला असल्याची माहिती गोपनिय सूत्राकडून माहिती मिळताच अहेरी पोलीस विभागाने सुदर्शन चक्र फिरवली, आणि गडचिरोली डिव्हीजनमध्ये सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत शिताफिने हैद्राबाद (तेलंगना) येथुन सदर माओवाद्यास अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने या जहाल माओवादी याच्यावर एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!