Home गडचिरोली विदर्भाची काशी ‘मार्कंडा देव’ येथे अवैध दारू चा महापुर…

विदर्भाची काशी ‘मार्कंडा देव’ येथे अवैध दारू चा महापुर…

0
362

विदर्भाची काशी ‘मार्कंडा देव’ येथे अवैध दारू चा महापुर…

सुखसागर झाडे
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे दररोज भाविक भक्तांची रेलचेल असते. अनेक भागातून व इतर राज्यातून सुध्दा भाविक मार्कंडा येथे दर्शनाला येत असतात. पण मार्कंडा येथे गेल्या काही वर्षांपासून सर्रास रीत्या दारूविक्री सुरू  आहॆ. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या मनात मार्कंडा तीर्थक्षेत्रा विषयी कलुषित भावना निर्माण होतं आहॆ याला आळा कसा बसेल याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहॆ.
गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन दशकांपासून दारूबंदी सुरू आहे.मात्र यातून काहीही साध्य झाले नाही. उलट दारू विक्री चे प्रमाण जास्त झाले आहॆ. बनावट दारूने तरुण पिढी म्रुत्यु च्या दाढेत जात असल्याचे चित्र दिसत आहॆ. जिल्ह्यातील अनेक तरुण दारू विक्री च्या धंद्यात लागले असून अनेकांवर गुन्हे नोंद झाले आहॆ.दुकानावर,पानटपरीवर झगडे भांडणाचे प्रमाण दिवसेंदिवस या दारुमुळे वाढत आहे.
मार्कंडा हे मोठे तिर्थक्षेत्र असून मोठ्या संख्येने भाविक ये जा करतात,दारूविक्री मूळे जनसामान्यांनावर व भाविकांवर परिणाम होत आहे परिणामी भाविकांची संख्या कमी होत आहे, या दारूविक्री मुळे गावातील तरुनपिढी शिक्षणाकडे न वळता दारूच्या आहारी जात आहेत,यामुळे कित्येक जण मृत्युमुखी पडले आहेत. या दारूच्या व्यसनामुळे कित्येक संसार उघड्यावर पडले आहॆ मात्र पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.

पोलीस पाटील हे  पोलीस विभाग आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यांची मुख्य कामे म्हणजे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना पकडणे आणि पोलिसांना माहिती देणे, रात्री गस्त घालणे, आणि गावातील महत्त्वाच्या घटनांची माहिती सक्षम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे आहे,परंतु तस होताना दिसत नाही पोलीस पाटील हे स्वतःच्या व्यवसाय कडे जास्त लक्ष देत गावकऱ्यांच्या समस्या कडे दुर्लक्ष करत आहे हे फक्त मानधनापुरते काम करत आहेत परिणामी सऱ्यास अवैध दारूविक्री गावात होत आहे,
पोलीस प्रशासन सुध्दा याकडे काणाडोळा करत आहे,  काही महिन्यांपूर्वी गावांतील सरपंचानी पुढाकार घेऊन गावातल्या बायकांना हाताशी धरून दारू बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती जैसे थे. त्यामुळे या गावाकडे कुणी लक्ष देणार का ?? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहॆ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!