Home गडचिरोली आरमोरी तालुक्यातील कुलकुली नाल्यावर पुलियाचे बोगस काम : अवैध मुरूम चा वापर

आरमोरी तालुक्यातील कुलकुली नाल्यावर पुलियाचे बोगस काम : अवैध मुरूम चा वापर

0
146

आरमोरी तालुक्यातील कुलकुली नाल्यावर पुलियाचे बोगस काम : अवैध मुरूम चा वापर

“आजाद समाज पार्टीचा”  प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

आरमोरी, सुखसागर झाडे : तालुक्यातील कुलकुली नाल्यावर झालेल्या निकृष्ट पुलियाच्या कामाबाबत ग्रामस्थांची तक्रार प्राप्त होताच आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व प्रभारी विनोद मडावी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 आगस्ट रोजी पुलियाची पाहणी करण्यात आली व गावाकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

भेटी दरम्यान प्रवाशी व गावाकऱ्यांशी संवाद साधले असता कळले की, पुलियामुळे बस बंद झाल्याने पालकांना मुलांना  शाळेत पाठविण्यास प्रचंड त्रास होत आहे, अनेक पालकांकडे साधन नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गिट्टी न टाकता माती मुरूम टाकल्याने रस्ता वरून गाड्या जाताना अपघात होत आहेत आणि गाड्यांचे नुकसान होत आहे.

ग्रामस्थ व पक्षाचे आरोप

<span;><span;>* ठेकेदार व अधिकाऱ्यांचा संगणमताने भ्रष्टाचार झालेला आहे.

<span;><span;>* विना रॉयल्टी अवैध मुरूमाचा वापर करण्यात आला.

<span;><span;>* गिट्टी न टाकता माती-मुरूमाने केलेले काम.

<span;><span;>* रोलर न चालवल्याने असुरक्षित रस्ता. त्यामुळे अपघात व गाड्यांचे नुकसान.

<span;><span;>* बस बंद असल्याने शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान.

आजाद समाज पार्टीची भूमिका

<span;><span;>* ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.

<span;><span;>* जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

<span;><span;>* ५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.

“निकृष्ट व भ्रष्टाचारपूर्ण काम सहन केले जाणार नाही. प्रशासनाने त्वरीत कारवाई केली नाही तर गावकरी व आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडतील.”असा निर्णय गावातील बैठकी दरम्यान घेण्यात आला.

यावेळी प्रकाश बन्सोड, धनराज दामले, सुरेंद्र वासनिक, राहुल कुकुडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!