Home गडचिरोली लॉयड मेटलच्या जड वाहतुकीचा कहर; चक्क पुलियावर होतोय मोठं-मोठया खड्यांचा बहर

लॉयड मेटलच्या जड वाहतुकीचा कहर; चक्क पुलियावर होतोय मोठं-मोठया खड्यांचा बहर

0
38

लॉयड मेटलच्या जड वाहतुकीचा कहर; चक्क पुलियावर होतोय मोठं-मोठया खड्यांचा बहर

आष्टी पुलियावर खड्ड्यांचा सापळा — निकृष्ट कामाचा संशय

चामोर्शी, सुखसागर झाडे :- सुरजागड लोह प्रकल्प अंतर्गत – Lloyds Metals and Energy Limited कंपनीच्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे मोठा कहर माजवला आहे. आजतागत शेकडो मनुष्याचा बळी घेतल्यानंतर आता तर चक्क पुलियावार डोळा टाकण्याची किमया घडवीली जातानाचे दृश्य बघावंयास मिळत आहे. अहोरात्र सतत चालू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे आष्टी परिसरातील पुलिया अक्षरशः उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
काही महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या या पुलियावर मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसरात्र सुरू असलेल्या अमर्याद अवजड लोखंड वाहतुकीमुळे पुलियावर प्रचंड ताण येत असून, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेष म्हणजे, नव्याने झालेल्या कामाची इतक्या लवकर दुरवस्था झाल्याने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
वाहनचालकांना खड्डे चुकवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा अपघाताचे प्रसंग टळले असले तरी, मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून, निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, “अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!