Home चंद्रपूर मोकाट जनावरांचे साम्राज्य कायम – ट्राफिक नियंत्रण सुरु असले तरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष

मोकाट जनावरांचे साम्राज्य कायम – ट्राफिक नियंत्रण सुरु असले तरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष

0
41

मोकाट जनावरांचे साम्राज्य कायम – ट्राफिक नियंत्रण सुरु असले तरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष

घुग्घुस येथील न.प.क्षेत्रात जनावरांचा वावर

घुग्घुस येथील नगरपरिषद क्षेत्रात मोकाट जनावराच्या वावर असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जनावराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

घुग्घुस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अलीकडेच वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, येथे वाहतूक पोलिस अधिकारी आणि होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूस कार्यालय उभारण्यात आले असून, लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी सतत सूचना दिल्या जात होते की, “सिग्नलचे पालन करा”, “वाहने रस्त्यावर उभी करु नका”, अशा सूचना वारंवार दिल्या जात असून, आता बंद झाले. अपघात होताच प्रशासनाला जाग येतात. त्यामुळे वाहतुकीत शिस्त निर्माण होत असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.

यामुळे शहरात वाहतूक नियंत्रणाबाबत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आता वाहतूक अधिकारीचे लक्ष आता फक्त दुचाकी वाहनावर जोर धरत आहे. दुसरीकडे मोकाट जनावरांची वाढती समस्या नागरिकांच्या चिंता वाढवत आहे. चंद्रपूर-वणी मार्गावर रस्त्याच्या डिवायडरवर आणि रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे मुक्तपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनधारकांना आपल्या वाहनाचा वेग कमी करून सावधगिरी बाळगावी लागत आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती आता संध्या दुचाकी पकडण्यावर जोर धरत आहे. मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशा जनावरांमुळे कोणताही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे की, नगरपरिषदेनं तत्काळ कारवाई करून या जनावरांचा बंदोबस्त करावा.

“शहराच्या सौंदर्याबरोबरच सुरक्षिततेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे. वाहतूक नियंत्रण यंत्रणा सक्षमपणे काम करत असतानाच नगरपरिषदेने आपली जबाबदारी पार पाडून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!