Home चंद्रपूर घुग्घुस येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व पंचशील विहाराचे लोकार्पण सोहळा...

घुग्घुस येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व पंचशील विहाराचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

0
31

घुग्घुस येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व पंचशील विहाराचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न


घुग्घुस (जि. चंद्रपूर) येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस यांच्या वतीने नवनिर्मित पंचशील बौद्ध विहाराचे लोकार्पण मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीचे औचित्य साधून दोन दिवसीय कार्यक्रम ठेवुन उत्साहात व शांततेत पार पडले. दिनांक १४ एप्रिल २०२६ सकाळी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तिलक नगर, अमराई लुंबिनी वन बौध्द विहारा, आमरपाली बौद्ध विहार अमराई, अर्धाकृती पुतळा पोळा मैदान, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया परिसर, पूर्णाकृती पुतळा, तर्फे तथागत भगवान बुद्ध मूर्ती वरती पुष्पांचा वर्षाव करुन स्वागत करुन त्रिशरण पंचशील घेतले जुनी तहसील कार्यालय, नगर परिषद मार्गे काढण्यात येऊन पंचशील बौद्ध विहार येथे मुर्तीचा समारोप करण्यात आला.
यानंतर मान्यवर उद्घाटक कवडुजी लटारु रामटेके यांच्या हस्ते फीत कापून विहाराचे व फलकाचे अनावरण करण्यात आले. बुद्धृं मुर्ती दानदाते अशोक सुखदेव पाझारे, यांचा हस्ते बौद्धाचार्य कृष्णांक पेरकावार तसेच भंते महात्तीस (नागपूर) व भिक्खु रत्नमनी थेरो (घुग्घुस) यांच्या उपस्थितीत बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंचशील ध्वज फडकविण्यात आला. तसेच सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
विशेष म्हणजे हा विहार पूर्णतः लोकवर्गणीतून उभारण्यात आला असून कोणत्याही राजकीय नेते, कंपनी किंवा शासनाचा निधी वापरण्यात आलेला नाही. भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या जिद्दीमुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला.
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त फकरु घागरगुंडे, सल्लागार बबन वाघमारे व विजय कवाडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्थानिक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लोकवर्गणी गोळा करून हा विहार उभारण्यात आला. सायंकाळी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
दुसरे सत्र दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या महात्मा फुले वंशज आयुनी. निताताई रमाकांत होले पुणे, दौलतरावजी धेंडे, एँड. जान्हवीताई धेंडे, सचिनजी आगरवाल इंजि. नेताजी भरणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यांचा उपलक्षावर व पंचशील बौध्द विहाराचे लोकार्पण सोहळा दिना भोजनदान व भीत गीतांचा जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायिका जयश्रीताई लोखंडे ३ मे २०१८ रोजी सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या विहाराच्या उभारणीला सुरुवात झाली. कोविड-२०२० महामारी तसेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे (मेंदूवरील शस्त्रक्रिया व कॅन्सर उपचार) या प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी सुमारे ८ वर्षांचा कालावधी लागला.
ज्या ज्या व्यक्तीनी समाज कार्य केले अशा सर्वांना पुष्पगुच्छ शिल्ड शॉल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस उपाध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष किशोरजी तेलतुंबडे, गुरुबालक मेश्राम, सपनाताई कुंभारे, कविताताई चांदेकर, मायाताई सांड्रावार तसेच यशोधरा महिला मंडळाचा अध्यक्षा रिताताई फकरु देशकर प्रतिमाताई कांबळे,पदाधिकारी व घुग्घुस येथील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी भीम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. पूर्णतः लोकवर्गणीतून उभारलेला हा विहार घुग्घुससाठी एक ऐतिहासिक ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!