Home Breaking News लाॅयड मेटल कंपनी सुरजागड येथील लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा...

लाॅयड मेटल कंपनी सुरजागड येथील लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू… जनतेत प्रचंड आक्रोश

0
261

लाॅयड मेटल कंपनी सुरजागड येथील लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू… जनतेत प्रचंड आक्रोश

लोह वाहतूक अजून किती जीव घेणार?; या बाबीकडे शासन लक्ष देणार का?

मुलचेरा, सुखसागर झाडे
लाॅयड मेटल कंपनी सुरजागड येथील लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिटूगूटा लगाम येथील व्यक्तीस चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून लॉयड मेटल कंपनी अजून किती लोकांची जीव घेणार? असा सवाल आता स्थानिक जनता करत आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम चिटूगुंठा येथील दशरथ सिताराम आत्राम या व्यक्तीस लॉईड मेटल कंपनी सुरजागड लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. या व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्हा हा खनिज संपत्तीने भरभरून असून शासन लोकांच्या जीवांकडे दुर्लक्ष करीत असल्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा आहे. कुटुंबीयांना कंपनीकडून एक करोड रुपये द्या, त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी स्थानिक जमावाने दिला आहे.

खमनचेरू, बोरी, शांतीग्राम, लगाम, मार्कंडा, चौवडमपल्ली, धनुर, चंदनखेडी, आष्टी येथे नेहमी अपघात होत असतात. या ओव्हरलोड होणाऱ्या वाहतुकीमुळे सर्वसामान्य जनतेला जीव गमवावा लागत आहे. याकडे शासन आणि प्रशासन हेतूपरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे. या परिसरातील जनतेला जीव मुठीत घेऊन रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. तरी जनतेकडून प्रशासनाला या मार्गाने जाणारे ट्रक थांबवा, अन्यथा मोठ आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!