गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या आरोग्या करिता “कुर्माघर” जनजागृती व आरोग्याच्या सोयी सुविधा नाम फाउंडेशन ने उपलब्ध करून द्याव्यात..!
राष्ट्रीय मानवाधिकार संघठण महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांची मागणी
गडचिरोली :- पुणे येथे नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती व स्नेह मिलन सोहळ्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात शेतकरी, सरपंच, उपसरपंच, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदाधिकारी कार्यकर्ता गडचिरोली जिल्ह्यातील चमुने सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रामुख्याने नाम फाउंडेशनचे चेअरमन नाना पाटेकर यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांनी भेट घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य व सामाजिक, सांस्कृतिक विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये परंपरागत रूढी परंपरा ने सुरु असलेला “कुर्मा घर” संदर्भात नाम फाउंडेशनने जनजागृती करणे बाबत चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष करून आदिवासी महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली व नाम फाउंडेशन च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यात कुर्मा घर बाबत जनजागृती करण्यासाठी व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत नाम फाउंडेशन च्या वतीने मदत करण्यात यावी अशी मागणी केली. अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेता मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पौर्णिमा विश्वास,
संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, राकेश खुणे, पुरुषोत्तम गोबाडे, नितेश खुणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल, गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे, तालुका सचिव संतोष बुरांडे, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके विशाखा सिह, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे, लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









