Home चंद्रपूर एका फळ दुकानदाराने दुसर्‍या फळ दुकानदारावर सत्तुरने हल्ला करून केले गंभीर जखमी…

एका फळ दुकानदाराने दुसर्‍या फळ दुकानदारावर सत्तुरने हल्ला करून केले गंभीर जखमी…

0
110

एका फळ दुकानदाराने दुसर्‍या फळ दुकानदारावर सत्तुरने हल्ला करून केले गंभीर जखमी…

 

घुग्घूस :- येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र समोरील व नवनियुक्त बस स्थानकच्या परिसरातील असलेल्या फळ दुकानदाराला नारळ कापण्याच्या सतुर नी डोक्यावर वार केला यात फळ दुकानदार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. १५ जुलै मंगळवारच्या अंदाजे रात्री ९.२० वाजता दरम्यान घडली.

माहितीनुसार फळ व्यावसायिक मोहम्मद तरवेज व त्याचा प्रतिस्पर्धी इर्शाद राईन या दोघांचे बस स्थानक परिसरातील फळाचे दुकान आहे घटनेच्या दिवशी रात्रीच्या दरम्यान कचरा टाकण्याच्या कारणावरून दोघात वाद निर्माण झाला व वाद विकोपाला जाऊन मोहम्मद तवंरेज ने इर्शाद राईन च्या डोक्यावर नारळ कापण्याच्या सतुर नी वार केला यात तो गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरताच बघ्याची गर्दी झाली. बाजूलाच पोलीस स्टेशन लागून असल्यामुळे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व इर्शाद ला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहम्मद तवंरेज ला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!