नागपूर विदर्भ ✍🏻किरण घाटे – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी नागपूर विभागाच्या वतीने,रोजगार संबधी व आरोग्य विषयक On line मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन काल शनिवार दि.५जुनला संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन खा. रामदासजी तडस (प्रदेशाध्यक्ष ),व त्यांच्या अर्धांगिनी शोभाताई तडस ( माजी नगराध्यक्ष )यांच्या शुभ हस्ते पार पडले. खा. तडस यांनी या शिबिराला या वेळी शुभेच्छा दिल्या .
महिलांना उद्योग क्षेत्रात कुठलीही अडचण आल्यास त्यांना आपण पुर्णता सहकार्य करू असे ते या वेळी म्हणाले .आयोजन समितीचे कार्य वाखाण्याजागे व काैतुकस्पद असल्याचा उल्लेख खा.तडस यांनी आपल्या बाेलण्यांतुन केला मोरघडे (सहसचिव )यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,या वेळी सर्व मान्यवरांना आयुर्वेदिक झाडांचे महत्व सांगून स्वागत करण्यात आले . सुनील खूजणारे (Asstt Director, Deptt of MSME, Govt of India )यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ . जीवेशजी पंचभाई उपस्थित होते. सदरहु शिबिरात 50 महिला पदाधिका-यांनी आपला सहभाग नाेंदविला.आयाेजित या आँन लाँईन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेख रित्या आयोजिका नयना संजय झाडे(भूतपूर्व नगरसेविका )यांनी केले तदवतचं उपस्थितीतांचे आभार मानले.अनेकांनी या कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली .