महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ. नानभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्तच्या ‘सेवा सप्ताह’ ची सुरवात

0
760

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ. नानभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्तच्या ‘सेवा सप्ताह’ ची सुरवात

विजय वडेट्टीवार (मदत व पुनर्वसन, बहूजन कल्याण समाज मंत्री) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खताचे वाटप; युवक काँग्रेसचा पुढाकार

गडचिरोली, सुखसागर झाडे:- शेतकरी पूत्र, शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकरी व ओबीसी नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन समाज कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्याकडून शेतकऱ्यांना खताचे वितरण करुन करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जि.प. सदस्य रामभाऊ मेश्राम, नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सतिश विधाते, नंदू वाईलकर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजणीकांत मोटघरे, शरद पाटील ब्राम्हनवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात ५ ते ११ जून दरम्यान ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान दररोज विविध घटकांतील नागरिक व महिलांना साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसच्या वतीने मागील ४६ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसने कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुढे खरिप हंगाम लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. युवक काँग्रेसचा हा उपक्रम काँग्रेस सेवाव्रती असल्याचे दाखवून देणारा आहे, असे प्रतिपादन यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी केले.
या सेवा सप्ताहाच्या यशस्वीते साठी संजय चन्ने, गौरव ऐनप्रेड्डीवार, कुणाल ताजणे, तैफीक शेख, प्रतिक बारसींगे, जितेंद्र मुनघाटे, घनश्याम मुरवतकर, रोहित निकुरे, शरद भरडकर, मारोती लाकडे, पुरषोत्तम समर्थ, संतोष मोहुर्ले, राजेंद्र ठाकरे, मंगरु मोहुर्ले, पुरषोत्तम मांदाडे, महेंद्र पगाडे, चिमनाजी करकाडे, माधव मंगर आदी सहकार्य करित आहे. या कार्यक्रमाचे संचालन व आभार महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here