चंद्रपूर -किरण घाटे – विशेष प्रतिनिधी :- जागतिक पर्यावरणादिना निमित्त आज शनिवार दि.५जूनला चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात व्रूक्षराेपनांचा कार्यक्रम पार पडला .दरम्यान चंद्रपूर येथील बाबूपेठ महिला बचत गटातील महिलांनी आज व्रूक्षराेपनाचा कार्यक्रम आयोजित केला हाेता.
यात प्रामुख्याने बचत गटाच्या मुख्य संयाेजिका चंदा वैरागडे , स्नेहल अंबागडे , त्रूप्ति राजूरकर , सुरेखा बुटले , संगिता टवालकर , रुपाली बुटले , वंदना खेळकर , तुलसी लिपटे , शारदा आंबटकर , शिल्पा आंबटकर , यांनी आपला सहभाग नाेंदविला .राजूरा तालुक्यातील मौजा धिडसी येथे सुनील उरकुडे कुमारी रितु हनुमंते, राहुल सपाट, बंडु काकडे,विनोद कोरडे,सिंधूबाई निखाडे,मायाबाई जिवतोडे,मंगलाबाई ढोके, मधुकर काळे,सतीश धोटे,डॉ.नारायण काकडे,अर्चना वरघने ,तलाठी विनोद खोब्रागडे यांनी गावाच्या मुख्य रस्त्याच्या बाजुला विविध प्रकारची झाडे लावली .
चिमूर तालुक्यात मनी राँय , अरविंद कुमरे , साैरव नेवारे , राजकुमार यादव , निखील तुरानकर यांनी सुध्दा वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला . या शिवाय वराेरा येथे वंदना आगलावे , राजू-याला श्रध्दा हिवरे , सविता भाेयर , संजिवनी धांडे , अल्का सदावर्ते , व मेघा धाेटे यांनी वृक्षारोपण केले. एक झाड लावून त्याचे जतन करण्यांचा संकल्प या वेळी व्रूक्षप्रेमींनी केला .