प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर):- भुमीहीन शेतमजुरांना व शेतकर्यांना जेवनाची व्यवस्था लाँकडाउन संपेपर्यंत निशुल्क करावी असे आव्हान वंचित बहुजन महिला आघाडीच्या गंगाताई इंगळे यांनी सरकारला केले. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही, रोजगार उपलब्ध नाही, जो काही मजुरवर्ग कामावर जातो त्याला रोजगार हवा तसा मिळत नाही.दैनंदिन जीवनात अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे कीराना दुकानातील वस्तूंचे भाव सोयाबीन तेलाचे भाव अव्वाच्या सव्वा झाले सर्व मालाचे भाव वाढले तसेच पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींवर उपासमारी ची वेळ आली आहे अशी असणारी परिस्थिती सध्या अमरावती जिल्ह्यात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही आणि सरकार या महामारी च्या काळात अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढवत आहे अशा वेळी सरकारने प्रत्येक व्यक्तीचे मायबाप म्हणून मिठा पासून ते पीठा पर्यंतचे जेवणाची व्यवस्था करावी परंतु सरकार सर्वसामान्यांसाठी टोकावर ची भूमिका घेत आहे या जिल्ह्याचे खासदार सौ नवनीत राणा बडनेरा मतदार संघात दरवर्षी दिवाळीला स्वखर्चाने किराणामाल वाटतात तसंच जर पाहिलं तर दिवाळीच्या काळात सर्वांकडे पैसा असतो मात्र आजची परिस्थिती अशी नाही, निवडणुक जिंकण्यासाठी ही योजना आखता काय? मग आता तुम्ही सर्वसामान्यांसाठी हा प्रश्न उचलून का घेत नाही, अशी टीका वंचित बहुजन महिला आघाडी च्या अमरावती जिल्हा महासचिव गंगाताई प्रेमानंद इंगळे यांनी केली व महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने भूमिहीन शेतमजुरांना व पाच एकरा आतील शेतकऱ्यांना लॉक डाऊन संपेपर्यंत जेवणामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू निशुल्क घरपोच द्याव्या अस आव्हान माध्यमांशी बोलताना केले.