मनमोहक रूप हे पर्यावरणाचे!

0
680

मनमोहक रूप हे पर्यावरणाचे!


राजूरा चंद्रपूर ,किरण घाटे विशेष प्रतिनिधी – – महाराष्ट्रातील महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणां-या सहजं सुचलं काव्यकुंजच्या सुपरिचित लेखिका व कवयित्रि सविता संजय भाेयर यांनी पर्यावरण दिना निमित्त !मनमोहक रुप हे पर्यावरचाचे !,ही खास काव्यरचना शब्दांकित केली ती आज येथे आम्ही देत आहाे !


– – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
सुंदर वन वृक्षांनी फुलली
सौंदर्याने नटली सजली
धरती माता ही आमची !!

बहरुनी आली वनराणी ही
लता फुलांनी सजली सृष्टी
संत जनांची कथा कहानी
इथेच घडली गाथा महान !!

डोल – डोलती वृक्ष सारी
वारा घेतो अपुला फेर
पावसाच्या सरी कोसळती
मातीला सुटला सुगंध गोड !!

मेघगर्जना गर्जत उठल्या
चमकत विजांचा चमचमाट छान
उधान वारा वाहू लागला
नांदे आरोग्य संपदा घराघरात !!

होऊनि धुंद पशुपक्षी भिरभिरती
इंद्रधनुष्यासवे घेऊनी आकाश
पावसाच्या सरी झेलत हसते
भुमाता किती ही गोड !!

आकाशाचे निळे पांढरे रूप
कुहू कुहू कोकिळा गाणी गात
वनी वनी घुमवीत नाद
पर्यावरणाचे हे मनमोहक रूप !!

सौ. सविता संजय भोयर, काव्यकुंज सहजं सुचलं ,राजूरा जि.चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here