प्रतिनिधी/सुखसागर झाडे
गडचिरोली/चामोर्शी:- ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच शाळा गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, यासाठी मानव विकास मिशनने गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत प्रवासासाठी एसटी बसची सोय उपलब्ध केलेली आहे. मात्र काही ठिकाणी बस पोहचत नसल्याने किंवा वेळेवर पोहचत नसल्याने शाळेपासून पाच किलोमिटर अंतरावर राहणाऱ्या मुलींना सायकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता आठवी ते दहावीच्या मुली तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता ११ वी ते १२वीच्या लाभार्थी मुलींचे नाव निश्चित केले जाते. यात गाव व शाळेपासून असलेले गावाचे अंतर याची तपशीलवार माहिती घेतली जाते. विद्यार्थिनींची यादी अंतिम केल्यानंतर मोफत सायकल वाटप केल्या जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना प्रवासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात येते. ग्रामीण भागांतून शहरे किंवा नजिकच्या खेड्यांत शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थीनींसाठी मोफत बससेवा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू आहे. तथापि, काही ठिकाणी या बसफेऱ्या जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित भागातील विद्यार्थीनींना शैक्षणिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, तसेच त्यांची सुरक्षाही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शालेय प्रवासासाठी विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
2020 -21 मानव विकास मिशन योजनेअंतर्गत भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लखमापुर बोरी येथे दिनांक 04-06-2021 शुक्रवार ला वर्ग 9 ते 12 वी मध्ये बाहेर गावावरुन शाळेत ये जा करनाऱ्या 06 विद्यार्थिंना कुंड़लीक जी कोहळे ( उपाध्यक्ष- शाळा व्यवस्थापन समिती भ. हाय. लख. बोरी) यांच्या हस्ते मोफत सायकलचे वाटप करण्यात आले . यावेळी भाग्यवान पिपरे ( सदस्य ग्रा. पं. लख. बोरी) , डी. डी. शिवनकर (मुख्याध्यापक तथा प्राचार्य भग. हाय. ल. बोरी) . पाल सर , शेंडे सर, बोरीकर बाबू, वन्नेवार , बहिरेवार, ई. कर्मचारी उपस्थित होते.