आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मागणीला यश
चिमूर (चंद्रपूर), आशिष गजभिये : चिमूर तालुक्यातील चना उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्याने अनेक शेतकरी चना खरेदी पासून वंचित असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने या घटनेची दखल आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी घेत मुदतवाढ दि 25 जून पर्यत नोंदणी करून घेत चना खरेदी ला यश आले.
शेती हंगाम 2020–21 मध्ये चना खरेदीचे मुदत वाढ मिळाल्या मुळे हंगाम 2020 –21 मध्ये चना खरेदीचे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांकडून दि 25 जून पर्यत चना खरेदी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत परंतु काही वंचित शेतकऱ्यांचे ग्रेडर नसल्याचे कारण सांगून खरेदी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत सुद्धा आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी संबंधित यंत्रणा शी सवांद साधून चना खरेदी करण्याची सूचना केलेली आहे तेव्हा यंत्रणेने ग्रेडर नसल्यास संस्थेच्या माध्यमातून कोण ग्रेडर असेल त्यांची माहिती पाठविण्याची तात्काळ सूचना केली आहे.
कोरोना काळ असून शेती हंगाम सुरू झालेला आहे तेव्हा वंचित चना उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दखल घेतली असून ज्या वंचित चना उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ नोंदणी करावी जेणेकरून चना खरेदी करता येईल
आमदार बंटीभाऊ भांगडिया हे शेतकऱ्यांचे हितकारक असून सातत्याने ते शासकीय यंत्रेनेशी संपर्क करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे.