कोरपना प्रतिनिधी/✍🏻 संतोष मडावी
चंद्रपूर/कोरपना :- आदिवासीं दुर्गम भागात आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार मा. अर्थ नियोजन वन व पालक मंत्री लोकलेखा समिती प्रमुख याच्या संकल्पनेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे सात वर्ष झाल्या निमित्त्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा या ठिकाणी वाटर फिल्टर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोली तांडा येथे सेनी टायझर मशीन माजी आमदार संजय धोटे यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली आज दिनांक चार रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला..
याप्रसंगी माननीय अरुण मडावी सरपंच विजय रणदिवे सरपंच सौ संगीता तलांडे तलांडे सरपंच मांडवा अनिल कवरांसे शहराध्यक्ष कोरपणा अनिल तलांडे डॉक्टर शालिनी तरोने वैद्यकीय अधिकारी मांडवा ओम पवार जिल्हा सचिव भायुमो जगाजी सोयाम ज्योतीराम मंगाम गणपत मडावी विपुल मूना वतन जे .डी .शिंदे आरोग्य सेवक आदी उपस्थित होते याप्रसंगी आदरणीय माजी आमदार धोटे यांनी ग्रामीण भागातील कोविड लसीकरण जनतेने न घाबरता लस घेण्याची आव्हान केले त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे त्याठिकाणी सूचना केल्या धानोली तांडा ग्रामपंचायत व प्राथमिक उपकेंद्र येथील कामकाजाबद्दल सरपंच विजय रणदिवे आरोग्यसेवक शिंदे यांचे कौतुक करून अभिनंदन केले डॉक्टर शालिनी तरो ने यांच्या कुशल आरोग्य सेवेबद्दल सुद्धा जनतेच्या वतीने आभार मानले गावातील नागरिक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.