चंद्रपूर. किरण घाटे /विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसच्या वतीने सुरु करण्यांत आलेल्या एक घास मदतीचा या उपक्रमाचा आजचा २०वा दिवस आहे .
येथील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात काेराेना महासंकटात काेराेना रुग्ण व त्यांचे भेटीला येणां-या नातेवाईंकांसाठी हा उपक्रम आरंभ करण्यांत आला आहे .चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वार्ड येथील राज राजेश्वर गायत्री, महाकाली सखी ,माऊली, सहेली,परिवार, सावित्रीबाई फुले तथा श्री संताजी महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने आज गरजुंना भाेजन डब्बे पुरविण्यांत आले.
गटांच्या संयोजिका चंदाताई वैरागडे, मिनाक्षी गुजरकर,रुपाली बुटले, आरती वैरागडे, वंदनाताई खेळकर,सुलभा जक्कुलवार, मनोज वैरागडे, कार्तिक बल्लावार, अभिजित वैरागडे यांनी एक घास मदतीचा या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. यावेळी कांग्रेस प्रदेश सचिव नम्रताताई आचार्य ठेमस्कर,उपाध्यक्षा सुनीताताई धोटे, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी,सचिव वाणी डारला,सदस्य लताताई बारापत्रे आदीं उपस्थित होते.