राजेंद्र गायकवाड/ जालना प्रतिनिधी
प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेकडून ‘मदत नव्हे कर्तव्य’ हया उपक्रमा स्व.गोपिनाथ मुंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंध बांधवांना किराणा किटचे घनसावंगी येथे वाटप करण्यात आले.
कोरोना लॉक डाऊनकाळामध्ये अंध बांधवांना अर्थिक समस्येला तोंड दयावे लागत आहे.सध्या या अंध बांधवांना हाताला कोणतेही काम राहिलेले नाही. शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्या आचार व विचाराने प्रेरित होऊन प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्य करते आहे.
प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अंध व्यक्तींना “मदत नव्हे कर्तव्य” या उपक्रमा अंतर्गत किराणा किटचे वाटप करण्यात आले.
या किराणा किटमध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तू साखर, चहापत्ती, शेंगदाने, मिठ, जिरे, मोहरी, मुगदाळ, हरबरा दाळ, तेल, गहू, तांदूळ, इत्यादी वस्तूचा समावेश आहे.
किराणा किट वाटप करतांना प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजूगुरु, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बी.आर. काळे, गिरिधर राजपूत, शफीक शेख, बालाजी माने यांच्यासह जनशक्ती पक्षाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष श्री. महादेव थोटे, अंबड ता. अध्यक्ष श्री. राजेंद्र गायकवाड,अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठलं चव्हाण,उपाध्यक्ष अनिरुध्द म्हस्के,तालुका अध्यक्ष विष्णू मीठे,महादेव शिंदे, अमजद खान पठाण,कांताराम वाहुले,गजू रोडगे,सतीश राखुडे नागरिकांची उपस्थिती होती.
या किराणा किट करिता संघटनेचे पदाधिकारी श्री.आर एम फटाले, श्री.योगेश झांबरे, मुकंद खरात फेरोज बेग, अमोल तोंडे गिरिधर राजपुत, अविनाश काळे, ज्ञानेश्वर घनवट, संदिप पितळे, दत्ता वाघमारे, दत्ता घायाळ, संदिप सोंळके, ज्योतिसिंग छानवाल, संतोष पिंडेवाड, कैलास गवळी, रामेश्वर दहिवाळ, मुकेश गाडेकर, श्रीम. मनिषा विंचुरकर, श्रीम. सविता एन्डोले- अंजाळे, गणेश तायडे, बालाजी माने, बस्वराज आबंदे यांच्याकडून अर्थिक मदत मिळाली आहे.
दिव्यांग व अनाथांना किराणा किटचे वाटप करतांना . संतोष राजगुरु, बी.आर. काळे, विठ्ठल चव्हाण, महादेव थोटे, गिरिधर राजपुत, शफीक शेख आदी दिसत आहेत.