विज कोसळून मृत्यू पावलेल्या संगमनेर तालुक्यातील महिलेस चार लाखाची मदत!

0
823

तहसीलदार अमोल निकम यांनी दिला धनादेश

 

प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर गायकर

 

 

अहमदनगर/संगमनेर :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील महिला अनिता संजय वनवे या महिलेच्या अंगावर वीज पडून तिच्यासह चार शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २९ मे रोजी सायंकाळी घडली होती. त्यानंतर शासनाकडून मृत महिलेच्या कुटुंबाला मंगळवारी दुपारी तहसीलदार अमोल निकम यांनी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

हिवरगाव पठार येथील संजय भिकाजी वनवे यांची पत्नी अनिता या शेतात शेळ्या चारत होत्या. त्याचवेळी अचानक विजांचा कडकडाट होवून वीज त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांच्यासह चार शेळ्यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी तहसीलदार अमोल निकम यांनी हिवरगाव पठार येथे येवून मृत महिलेचे पती संजय वनवे यांच्याकडे चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी उपसरपंच दत्तात्रय वनवे, माजी सरपंच भाऊसाहेब नागरे, तलाठी सोमनाथ कटारे, ग्रामसेवक विजय आहेर, पोलीस पाटील गौतम मिसाळ, राहुल डोंगरे, अमोल जाधव, कोतवाल असीफ शेख आदी उपस्थित होते. सरकार च्या तत्पर मदती बद्दल ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे आभार व्यक्त केले आहे. अत्यंत हलाकित असणाऱ्या या परिवारास एक दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here