विशेष प्रतिनिधी/किरण घाटे
चंद्रपूर :- एप्रिल व मे महिण्यात चंद्रपूरात कडक उन तापली .गर्मीने नागरिक अक्षरशा हैरान झाले हाेते .त्यातल्या त्यात घरातील पंखे , कुलर काम करीत नव्हते.अश्यातच काल मंगळवारी एक जुनला चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात पाऊस बरसला तरं चंद्रपूरला काल मध्यरात्री पावसाने सलामी दिली.
बाळापूर तळाेधी येथे काल दुपारी झालेल्या वादळामुळे प्राथमिक आराेग्य केन्द्र परिसरातील एक झाड उन्मळुन पडल्याचे व्रूत्त आहे .आज सकाळी चंद्रपूरात पावसाची रिमझिम सुरुच असुन हवेत गारठा निर्माण झाला आहे .या पावसाने शेतक-यांना दिलासा दिला आहे .शेतीच्या कामांना आरंभ झाल्याचे जिल्ह्यात सर्वत्र दिसून येते .