कोविड काळात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करू नका
तदर्थ वैद्यकीय अधिकारी संघटना तर्फे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर
बी.ए.एम.एस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना शासनाने नियमीत पदभरती वेळी प्राधान्याने सरळसेवा भरतीअंतर्गत सामावून घ्यावे
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी : राज्यात माहे जून २०१९ पर्यंत बी.ए.एम.एस आहर्ताधारक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्थायी वैधकीय अधिकारी पदावर कार्य करीत होते सदर बी.ए.एम.एस वैधकीय अधिकारी उपरोक्त संदर्भ क्रमांक १ व२ अन्वेय समावेशानंतर राज्यात वैधकीय अधिकारी यांचे मोठ्या प्रमाणात पद रिक्त झाले त्यामुळे ग्रामीण भागातील जनते पर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी यायला सुरुवात झाली.
त्यानंतर शासनाच्या म्हणण्या प्रमाणे प्रयत्न करूनही रिक्त पदी एम.बी.बी.एस आहर्ताधारक उमेदवार नसल्याने अशा ठिकाणी बी.ए. एम.एस आहर्ताधारक उमेदवाराची कंत्राटी वैधकीय अधिकारी म्हणून जून २०१९ पदभरती करण्यात आली त्यानंतर मार्च २०२० पासून राज्यात कोरोना ची सुरवात झाली या संकट काळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या वैधकीय अधिकाऱयांनी आपल्या कार्यक्षेत्रात सेवा दिली
मे २०२० ला एम.बी.बी.एस कंत्राटी वैधकीय अधिकारी यांची शासनाने वेतनवाढ केली मात्र याच समान जोखमीचे काम करणाऱ्या बी ए.एम एस वैधकीय अधिकारी यांची शासनाने नेहमी प्रमाणे कुठलीही वेतनवाढ न करता त्याना डावलण्यात आले. तरी मात्र या वैधकीय अधिकारी यांनी कोरोनाची साथ ,उद्रेकाचा गांभीर्य लक्षत घेऊन कुठलेही आंदोलन न करता,आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात सेवा देत राहिले. मागील १५ ते २० दिवसापासून कोविड योद्धा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या याच कंत्राटी बी.ए. एम.एस वैधकीय अधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी एम.बी.बी.एस वैधकीय अधिकारी यांची शासन नियुक्ती करून इतक्या वर्ष सेवा देणाऱ्या बी.ए एम.एस वैधकीय अधिकारी यांच्यावर राज्य शासनाने उपासमारीची वेळ आणली आहे.
भविष्यात सदरील एम.बी.बी एस बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी उच्चशिक्षणासाठी अथवा बंधपत्र कालावधी संपल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त झाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा व्हेंटिलेटर वर जाण्याशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उपरोक्त आदेशात अंशता बदल करून व कोविड साथ उद्रेक लक्षात घेऊन एम.बी.बी.एस बंधपत्र वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय इथे नियुक्ती देऊन त्यांच्या शिक्षणाचा व कौशल्याचा उपयोग डी.सी.एस.सी अथवा सी.सी.सी येथील जोखिमेच्या रुग्णांना रुग्णसेवा देण्यात उपयुक्त ठरेल व बी.ए.एम.एस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सुद्धा कार्यमुक्त होणार नाही तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. राज्याचे पुनर्वसन,आपदा मंत्री जिल्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे आज दिनांक २९/५/२०२१ ला जिल्याचे दौऱ्यावर असतांना ब्रम्हपुरी येथे तदर्थ वैधकीय अधिकारी यांच्या समस्या विषयी चर्चा करून विविध मागणी साठी तदर्थ वैद्यकीय अधिकारी संघटना चंद्रपुर तर्फे डॉ.सागर माकडे, डॉ आदित्य झलके,डॉ अभिजित भुरले व इतर वैद्यकीय अधिकारी यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.