जि.प.अध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन
गडचिरोली /सुखसागर झाडे
गडचिरोली-सिरोंचा: तालुक्यातील ग्रामपंचायत वेंकटापूर हद्दीतील वेंकटापूर आणि बामणी येथे जिप अध्यक्षांच्या प्रयत्नाने 20 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
वेंकटापूर येथून तेलंगणा राज्य नजीक असल्याने तेथील नागरिक वेंकटापूर येथे येऊन अहेरी आणि सिरोंचाला जात असतात. वेंकटापूर गावातील शेतक-यांना शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन जिप सदस्य जयसुधा जनगाम, सरपंच अजय आत्राम यांनी जिप अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे पाठपुरावा केला. जिप अध्यक्षांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 30/54 योजनेतून जवळपास 20 लाख रुपयांचा निधी गावातील विकास कामांसाठी मंजूर केला.
भूमिपूजन कार्यक्रमाला आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम,वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, उपसरपंच मंजुळा दिकोंडा, ग्रापं सदस्य तुळशीराम गुरुनूले, माजी सदस्य अंकुलू जनगाम, जेई मसे, विजय रेपालवार, अनिल मांदाडे, प्रशांत गोडसेलवार, साई मंदा, गणेश नैताम,राकेश अल्लूरवार यांच्यासह आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.