भाजपा चे वतीने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अन्न धान्य किट , निराधारांना कपडे ,मास्क , स्यानीटायझर व आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप
प्रतिनिधी / सुखसागर झाडे
गडचिरोली :- मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुतीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी ७ वर्षे पूर्ण झाले आहेत.यानिमित्त ‘सेवा हीच संघटना’ हा भाजपाचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण गडचिरोली विधानसभा मतदार संघात ‘सेवाकार्य दिन’ साजरा केला जाणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळात जनतेची अधिकाधिक मदत करण्याच्या उद्देशाने भाजपाकडून राज्यभरात २०,०००हुन अधिक गावांमध्ये सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.एकट्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या सेवा कार्यक्रमांमध्ये चामोर्शी तालुका गडचिरोली तालुका , धानोरा तालुक्यातील विविध 300 गावातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार आहेत.संकटकाळात जनसेवेच्या प्रत्येक कार्यात भाजपाचे कार्यकर्ते सदैव अग्रेसर असतील यावर माझा विश्वास आहे. कारण हेच आमचे संस्कार आहेत, हेच आमचे संघटन! असे आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले व आमदार डॉ देवराव होळी यांच्या उपस्थितीत आजपासून या सेवाकार्याला गडचिरोली विधानसभा मतदार संघातील चामोर्शी येथून सुरुवात करण्यात आली स्थानिक ढोरफोडी येथे येथील समस्त रहिवाशी नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
स्थानिक चामोर्शी शहरात आतापर्यंत सेवाकार्य अंतर्गत दोन हजार पाचशे आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी यांना कार्ड वाटप करण्यात आले तसेच या सेवाकार्य अंतर्गत तालुक्यातील वालसरा आमगाव येथे पुन्हा जोमाने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महत्वाची बैठक घेण्यात आली यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष भाऊ पीपरे , भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे, युवा मोर्चा
अध्यक्ष प्रतीक राठी , ज्येष्ठ नेते जयराम चलाख , राकेश सावकार भैसारे व पदाधिकारी कार्यकर्ते कोरोना नियम पाळत उपस्थित होते.