कर्तव्य बजावून दुचाकीने जाताना झालेल्या अपघातात सि.एन. एम. सुष्मा दुर्गे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
916

कर्तव्य बजावून दुचाकीने जाताना झालेल्या अपघातात सि.एन. एम. सुष्मा दुर्गे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

आरोग्य विभागात कर्त्यव्य बजावताना मृत्यू झाल्यास सबंधित कर्मचारी यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावे

सुखसागर झाडे :- चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सोनापूर येथे कार्यरत अनेक वर्षांपासून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, सुपरिचित, सोनापूर वासीय जनतेच्या हाकेला प्रतिसाद देत आरोग्य सेवा देणाऱ्या, सर्वांना समजून घेऊन तण-मनाने काम करणाऱ्या कु. सुषमा दुर्गे(पाटिल) CNMसिस्टर सोनापूर, यांचे दिनांक 26 मे ला सोनापूर जवळ चामोर्शी मार्गावर दुचाकीने जाताना झालेल्या जड वाहना सोबत झालेल्या
अपघातात गंभीर जखमी झाल्याने, त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते, पण काल सायंकाळी 7:00 वाजता GMC नागपूर, येथे दुःखद निधन झाले। त्यांच्या अशा अचानक जान्याने, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दुर्गे परिचारिका यांनी गावाला दिलेली आरोग्यसेवा, योगदान, कायम स्मरणात राहील.
त्यांच्या परिवारास, या दुःखातून सावरण्याचा धैर्य मिळो
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
आरोग्य विभागातील कोणतेही कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here