सिंदेवाही तालुक्यातील डिजिटल मीडियाच्या माध्यमातून वन जमीन अतिक्रमण पर्दाफाश करणाऱ्या प्रतिनिधींच्या पाठीशी खंबीर : पुरोगामी पत्रकार संघ राजुरा
अमोल राऊत
राजुरा(चंद्रपूर)7/08/2020:- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात ग्रामीण भागात राहून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक घटनांना वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करणारे निर्भीड पत्रकार अरुण मादेशवार हे सातत्याने करीत आहे.हे निर्भीड काम करीत असतांना असाच एक गुंजेवाही मधील वनजमिनी वरील अतिक्रमण प्रकरणाचा डिजिटल मीडियातुन वृत्त प्रकाशित करून त्यांचा पर्दाफाश केला,वा या वृत्ताची दखल घेऊन वन प्रशासनाने चौकशी सुरु केली व अतिक्रमण हटविण्याच्या सूचना वनजमीन अतिक्रमण धारकांना दिल्या.याच घटनेचा राग मनात तेवत घेऊन तेथील काही गावगुंडांनी प्रतिनिधी अरुण मादेशवार यांना मारण्याचे कटकारस्थान रचून अरुण मादेशवार हे गुंजेवाही वरून सिंदेवाही ला आपल्या मुलासोबत जातं असतांना मध्येच त्यांना अडवून,आमची बातमी का बरं दिली”?असे विचारणा करीत अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली वा त्या दोघांना बेदम मारहाण केली.त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले.एवढे क्रूर कृत्य त्या गावगुंडांकडून घडवून आणले असून त्या गावगुंडांच्या या गैर कृत्याचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने विरोध करून त्या सर्व दोषी गावगुंडांवर तुरंत कडक कारवाई करून कठोर शिक्षा करावी जेणेकरून भविष्यात कुणी अशे लोकशाहीला घातक असे काम करणार नाही अशा मागणीचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने राजुरा ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत,श्रीधर बोल्लुवार,मनोज धोंगडे,आनंदराव देठे,संतोष कुळमेथे,उत्कर्ष गायकवाड,प्रदीप बोबडे,रवी बावणे,धनराज उमरे,आदींची उपस्थिती होती.