कोरोना युद्धात काम करणारा प्रत्येक सामान्य सैनिक हाच कोरोना युद्धाचा खरा नायक बस्वराज बागबंदे ( नगराध्यक्ष)

0
769

उदगीर तालुका प्रतिनिधी/बाबूराव बोरोळे

मो.9823781042

कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांची सेवा जगतगुरू तुकोबारायांच्या म्हनी प्रमाणे ” जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा ” या म्हनी प्रमाणे सर्वसामान्य माणसाला पोटाच्या भुकेपासुन ते अंत्यविधीपर्यंत सर्वच स्तरावर योग्य ती मदत करनारे ‘ रोटी कपडा बॅंकेचे स्वयंसेवक ‘ व उदगीर नगरपरिषदेतील अग्निशमन विभागातील कर्मचारी हे सर्वसामान्य सैनिकच खर्या अर्थाने कोरोना महामारीच्या लढाईचे महानायक आहेत असे मत गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने नगर परिषद उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात नगर परिषदेचे नगराध्यक्ष बस्वराजबागबंदे यांनी व्यक्त केलेे

नवनाथ गायकवाड यांच्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपरिषदेतील अग्निशमन दलातील विभाग प्रमुख विशाल आल्टे, फाॅयरमन उमाकांत गंडारे, फाॅयरमन उत्कर्ष कांबळे, आतुल गवारे, संतोष घाडगे, विपुल कांबळे, शेख महम्मद अरबाजो द्दीन फयाजोदीन, सत्येजित कांबळे व रोटी कपडा बॅंकेचे अध्यक्ष सिद्दिकी असद जमाल, सचिव शेख गौस खुर्शीद अहमद, कोषाध्यक्ष सिद्दिकी खुर्शीद आलम, सदस्य शेख जमील शबीर, शेख महेबूब खुर्शीद, शेख जावेद बशीर व शेख सलमान या सर्व स्वंयसेवक यांचा कोरोना योद्धा म्हणून शाल, पुष्पहार व गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर नगर परिषदेचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे हे होते तर विशेष अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड व गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सं.सचिव व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद सदस्य मनोज पुदाले, शहाजी पाटील, अॅड दत्ता पाटील, अॅड सावन पस्तापुरे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवनाथ गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. मदन पाटील यांनी तर आभार दयानंद पाटील यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ सूर्यवंशी, गिरीष स्वामी, मनीष मुळे, गौरव माने, गोविंद कांबळे यांच्यासह गंगासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सिद्धार्थ सुर्यंवंशी यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here