जनतेनी कोरोना लस घ्यावी – माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनाशयक वस्तू किट वाटप
चिमूर, आशिष गजभिये : जगासह देशात भयंकर कोरोना आजार आलेला आहे. बलाढ्य देशात सुद्धा कोरोना ने कहर केला आहे. आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच उपाय योजना करून मुकाबला करून जीवित हानी वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहे. भविष्यात कोरोना आजार वाढू नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करने आवश्यक आहे. आपल्याला पूर्ण आयुष्य जगायचे असेल तर आपल्याला कडक पालन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नी कोरोना आजार वाढू नये यासाठी खूप प्रयत्न केले.
80 कोटी जनतेला धान्य दिलेला आहे. असून सतत उपाय अमलात आणीत असताना अश्या महामारीत विरोधक मात्र टीका करीत आहे. जगातील 200 देशाना औशोधोपचार देत आहोत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री निवळ भूलथापा देत आहे. राज्यात आम्ही विरोधक असलो तरी सेवा कार्य करीत आहे. जिल्ह्यातील गावात विलगिकरन केंद्र सुरू करण्यासाठी निधी दिला आहे. तेव्हा ग्राम पंचायत नी विलंगिकरण ची तयारी करावी . कोरोना लस घ्यावी आणि कोरोना ला मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे.
चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी व त्यावर मात करण्यासाठी 200 बेड चे गृहविलगिकरण, 50 बेड ऑक्सिजन व आदी उपाय योजना सुरू करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे तेव्हा नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे सांगत नागरिकांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.
खासदार अशोक नेते म्हणाले की कोरोना किटाणू संपूर्ण जगात असून दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात पसरला असल्याने प्रमाण वाढलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री यांना सूचना करून सावध राहण्याची सूचना केली होती. कोरोना लस ची समाजात गैरसमज पसरविल्या जात असून ते चुकीचे आहे तेव्हा कोरोना वर मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून चिमूर येथील अभ्यंकर मैदान वरील सभागृहात ऑटो चालक मालक, मातंग समाज, नाभिक समाज बांधव यांना जीवनश्यक वस्तू किराणा किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्य मंत्री हंसराजजी अहिर, खासदार अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडिया, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर डॉ श्यामजी हटवादे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, छायाताई कंचर्लावार, निताताई लांडगे भारती गोडे आदी उपस्थित होते.
दरम्यान कोरोना काळात मृत पावलेल्या विषयी मौन श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. संचालन राजु देवतळे व आभार जयंत गौरकर यांनी व्यक्त केले. यावेळी नाभिक व्यवसायिक, मातंग समाज, ऑटो चालक मालक वर्ग उपस्थित होते.