बुद्ध पौर्णिमा निमित्त उस्मनाबादच्या फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन
उस्मानाबाद (मराठवाडा), किरण घाटे – विश्र्वाला शांतीचा संदेश देणारे ,महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त अर्थात बुध्द पाैर्णिमा निमित्त आज बुधवार दि. २६मे ला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृतिस पुष्पहार अर्पण करण्यांत आले . या वेळी बुद्ध वंदना घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले . बुद्ध पौर्णिमा निमित्त मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला. उपरोक्त कार्यक्रमाला नगरसेवक राणा बनसोडे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे, भीमराव बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संग्राम बनसोडे,संजय गजधने,मेसा जानराव,शशी माने,सोमनाथ गायकवाड,स्वराज जानराव,मुकेश मोटे,अतुल लष्करे,प्रशांत ओव्हाळ,बापू कुचेकर,रमेश कांबळे,अनुरथ नागटिळक,राजाराम बनसोडे,राजेंद्र बनसोडे,लहु बनसोडे अादीं उपस्थित होते.दरम्यान या दिना निमित्त उस्मनाबादचे सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारे यांनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या सामुहिक प्रयत्नाच्या जाेरावर सर्वांची काेराेना महामारीतुन मुक्तता व्हावी अशी प्रार्थना देखिल त्यांनी या वेळी केली.
Home महाराष्ट्र बुद्ध पौर्णिमा निमित्त उस्मनाबादच्या फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाला...