चंद्रपूर नगरीत चालणां-या अवैध व्यवसायांवर आळा घाला यंग चांदा ब्रिगेड संस्थेची मागणी
चंद्रपूर, किरण घाटे – ब्लँक गोल्ड सिटी म्हणून अख्ख्या विदर्भात आेळख निर्माण करुन देणां-या चंद्रपूर नगरीत सध्याच्या स्थितीत अवैध व्यवसायने माेठ्या प्रमाणात डाेके वर काढले आहे .दिवसांगणिक सट्टा , दारु , सुंगधित तंबाखु विक्रीचे प्रमाण वाढले आहे .शहरातील अनेक भागात हे अवैध धंदे राजराेसपणे सुरु आहे.जटपूरा ते पठाणपूरा या ही मार्गावर हे अवैध व्यवसाय सुरु झाले आहे .काेराेना संकटात हे अवैध व्यवसाय कमी हाेण्या ऐवजी ते झपाट्याने वाढले असल्याचे एकंदरीत दिसून येते. अवैध दारु व खर्रा विक्रीने तरं कहरचं निर्माण केला आहे .अमली पदार्थांची विक्रीही दिवसा ढवळ्या जाेरात सुरु असुन तरुणपिढी या आहारी गेल्याचे एका निवेदनात म्हटले आहे .अवैध व्यवसायांतुन अनेक कुटुंबात वाद निर्माण हाेणे सुरु झाले असुन या वादातुन एकादी अनुचित घटना हाेण्यांची शक्यता नाकारता येत नाही .महाराष्ट्र शासनाने सुंगधीत तंबाखुवर बंदी घातल्या नंतर देखिल या तंबाखुची विक्री सर्रासपणे शहरात सुरु आहे .पुरुषां साेबतच महिलांना आता त्रास हाेवू लागला आहे .परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता या शहरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर तातडीने आळा घालावा अश्या आशयाच्या मागणीचे एक निवेदन नुकतेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरचे पाेलिस अधीक्षक यांना सादर करण्यांत आले आहे .निवेदन सादर करतांना या संस्थेचे शहर संघटक राशीद हुसैन विलास वनकर सलीम शेख कलाकार मल्लारप ,विलास साेमलवार व प्रतिक शिवनकर प्रामुख्याने उपस्थित हाेते .