महाराष्ट्रातील महाविद्यालय तथा विद्यापीठाची वार्षिक व परिक्षा फी माफ करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बल्लारपूर (चंद्रपूर), किरण घाटे विशेष प्रतिनिधी : कोरोना महामारीमुळे अनेकांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कित्येकांचे व्यवसाय बुडीला लागले, नोकऱ्या गेल्या, अनेक विद्यार्थाचे आधार हरपले, काहींचे आर्थिक हाल झाले आहे. सध्याच्या स्थितीत विद्यार्थ्यांकडे काहीच आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठाची चालु शैक्षणिक वर्षाची वार्षिक व होणांऱ्या परीक्षाच्या सर्व फी माफ करण्यात याव्यात. यासाठी आज दि.25 मे ला वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर यांचे वतीने तहसीलदार संजय राईंचवार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करतांना स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, भोजेंद्र दुबे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.