नागरिकांसोबत अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या मुजोर ग्रामसेवकांची हकालपट्टी करा
बामणवाडा येथील नागरिकांची मागणी.
राजुरा ( तालुका प्रतिनिधि)
बामणवाडा हे गाव राजुरा शहराला लागून असून या गावात मोठ्या प्रमाणावर शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी,अधिकारी, वास्तव्यास आहेत. यामुळे बामणवाडा ग्रामपंचायत च्या सामान्य फंडात मोठी रक्कम जमा होत असते. तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणूनही सदर ग्रामपंचायत नावारूपास आलेली आहे.
सदर ग्रामपंचायत मध्ये मागील वर्षी पासून कवटाळकर ग्रामसेवक रुजू असून या ग्रामसेवकांच्या मुजोरीपणामुळे व ग्रामपंचायत मध्ये वॉर्डा चे प्रतिनिधीत्व करणाऱ्यां प्रतिनिधींच्या कमजोरीचा फायदा घेत चक्क गावातील सुशिक्षित नागरिकांचा अपमान करून अर्वाच भाषेत सदर ग्रामसेवक बोलत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कायद्याचे अडथळे आणत सदर ग्रामसेवक कुणाच्याही कामाकडे लक्ष देत नसून त्या ग्रामपंचयत मध्ये ग्रामपंचायत सदस्या यांचे पती सुद्धा कर्मचारी आहेत मात्र त्यांना सुद्धा गावातील नागरिकांचे वेळेवर कामे करता येत नाही.
सदर ग्रामपंचायत मध्ये मृत्यू नोंद,. नवीन गृहकर, नवीन नळ कनेक्शन अशी कामे रखडलेली असताना या कामासाठी गावातील नागरिक ग्रामपंचायत मध्ये गेल्यास कावटाळकर ग्रामसेवक कायद्याचे अडथळे सांगून नागरिकांना परत पाठवीत आहे. यामुळे सदर ग्रामसेवकाची मुजोरी वाढली असल्याचे नागरिक बोलत आहेत.
वॉर्ड नं. एक मध्ये लेअाऊट असून. सदर वॉर्डात मागील विस वर्षापासून नागरिक घरे बांधून वास्तव्यास आहेत. रोड नसल्याने पावसाळ्यात पाणी साचत असते, यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वॉर्डातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक ऊईके यांनी सदर बाब ग्रामसेवकांच्या निदर्शनास आणून दिली तर त्यांचे सोबतच अर्वाच्च भाषेत बोलायला लागले. रोड बनविणे अमाचा काम नाही, घरासमोर रोड स्वतः बनवा, घर उंच बांधायला पाहिजे, असे बोलून सदर ग्रामसेवक एका प्रतिष्ठित व्यक्तीचा अपमान केलेला आहे अश्या निष्क्रिय व कामचोर ग्रामसेवकांची त्वरित हकालपट्टी करून नवीन ग्रामसेवक रुजू करावा अशी मागणी अशोक ऊईके व गावातील नागरिकांनी केली आहे.