चामोर्शी नगरपंचायत ला मिळालं अग्नीशमन वाहन
नगरपंचायत वासीयांना आपत्कालीन समस्येवर मात करण्यास होणार मदत
चामोर्शी, सुखसागर झाडे : लोकप्रिय आमदार डाँ. देवरावजी होळी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून चामोर्शी नगरपंचायत ला मिळालेला अग्णिशामक वाहण आज शहरात दाखल झाले.
अनेकदा शहरात आग लागल्याच्या घटना घडल्या परंतु अग्णिशामक वाहणा अभावी मोठ्या प्रमाणात जान मालाचा नुकसान होत होते. अनेक कुटुंबाची आर्थिक व जिवीत हानी होत असल्याने त्यांच्या वर विविध समस्यांचे डोंगर कोसळत होते. आता या वाहणामुळे आगीच्या घटणावर नियंत्रण मिळविता येईल त्यामुळे चामोर्शी शहरातील सर्व नागरीकांनी आमदार डाँ. देवरावजी होळी साहेबांचे जाहीर आभार मानले आहे.