पेट्रोल, डिझेल, गैस दर वाढीच्या व वाढती महागाईच्या विरोधात अनोखे आंदोलन

0
893

पेट्रोल, डिझेल, गैस दर वाढीच्या व वाढती महागाईच्या विरोधात अनोखे आंदोलन
पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना पुष्पगुच्छ, तिलक, मिठाई देऊन केले अनोखे आंदोलन

कोठारी, राज जुनघरे : सध्या पेट्रोल, डिझेल, गैस भाववाढ गगनाला भिडलेली आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्व सामान्य माणसाला जगणं या महागाई मुळे कठीण झाले आहे. एवढे मोठे पेट्रोल, डिझेल, गैस भाव वाढविण्याचे कटकारस्थान तथाकथित भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत असुन ह्या बेशरम सरकारला जवाब देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडुन ह्या सरकार विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. बिआरएसपी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे व युवा नेते मोहनलाल भडके यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद चंद्रपूर समोर बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पार्टी तर्फे आज हे आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गैस दर वाढीच्या विरोधात आंदोलना दरम्यान राजू झोडे यांनी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय सरकारवर निशाणा साधत जोरदार टिका केली. पेट्रोल, डिझेल, गैस चे दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होत आहेत. तरी हे निर्लज्ज सरकार तोंड दाबून बुक्यांचा मार सामान्य जनतेला देत आहे. सरकारच्या मनमानी व हुकुमशाही धोरणामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे. हेच सरकार निवडुन येण्यापूर्वी मोठ मोठे आश्वासन देवून जनतेला भुरळ पाडत होती आणि आता हेच सरकार सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार निघाल्याने जनता नैराश्याने घेरली आहे. अशा या निर्लज्ज सरकारला जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. जर पेट्रोल, डिझेल, गैस महागाई कमी करण्याचा निर्णय घेतला गेला नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पार्टी विदर्भात तिव्र आंदोलन करेल असा सज्जड इशारा राजु झोडे यांनी सरकारला दिला आहे. सदर आंदोलनात संजय मगर, राजु रामटेके, गुरू भगत, अजय पागडे, महेंद्र झाडे, अनुकूल शेंडे, संपत कोरडे, सुधिर गेडाम, शक्ती इंगोले, अनिल मानकर, शैलेश बारसागडे तसेच पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here