नगर पालिका मस्त, जनता त्रस्त, अधिकारी भ्रष्ट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक कार्यात पुढाकार…
वणी/प्रतिनिधी : नगर परिषद कोरोना काळात अतिरिक्त स्वच्छता अभियान अथवा शहर निर्जंतुकीकरण विशेष अभियान राबविताना दिसून येत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात पालिका प्रशासन केवळ रस्त्यावर उभे राहुन दंडात्मक पावत्या फाडून जनरल फंड वाढविण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहे. असे चित्र जनतेला दिसत आहे. कोरोनाच्या महामारीत नगर पालिका कोणतेच स्वच्छता अभियान, निर्जंतुकीकरण करताना दिसत नाही. शहरात कुठेच आरोग्याच्या दृष्टीने काम करताना दिसत नाही. त्यामुळे आता वणी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतः पाठीवर पंप घेऊन वणीतील भीमनगर, गोकुलनगर परिसरात तसेच गणेशपूर गावात निर्जंतुकीकरण केले. नगरपालिका ही फक्त आता नामधारी राहली अस दिसत आहे. एकही नगरसेवक, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी जनतेच्या आरोग्यासाठी कार्य करताना दिसत नाही. अशी नागरिक चर्चा करत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या उपक्रमात प्रशांत भालेराव, दीपक नवले, विवेक पांडे, प्रमोद सप्रे, निलेश चचडा, कवडुजी पिंपळकर, प्रसन्न संदलवर, प्रकाश कौरासे, अनिल झाबक, प्रज्योत रामगिरवार, संकेत अक्केवार, ऍड धगाडी, मनोज सरमोकदंम, प्रवीण सातपुते, सुहास नायगावकर, अनिल बोढाले यांनी सहभाग घेतला होता.