कल्याण समितीच्या उपक्रमाला मिळताेयं उत्तम प्रतिसाद
उस्मनाबादच्या शासकीय रुग्णालयात ग्रामसमृध्दी सामाजिक संस्थेच्या वतीने पाणी दान
उस्मानाबाद मराठवाडा , किरण घाटे –रविवार दि. २३मे ला उस्मनाबाद शासकीय रुग्णालयात ग्रामसमृध्दी सामाजिक व बहुउद्देशीय संस्था,बरमगाव (बु.) यांच्या वतीने पाणी दान करण्यात आले.या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अमर आगळे यांना मान्यवरांच्या हस्ते या वेळी प्रमाणपत्र बहाल करण्यांत आले.सोबतच दैनंदिन शासकीय रुग्णालय व महिला रुग्णालयात उमेश राजे निंबाळकर व मृत्युंजय माणिक बनसोडे यांच्या कडुन पाणी दान केले जात आहे. परिचारिका कोकाटे व परिचारक अब्दुल राेफ शेख यांनी रुग्ण कल्याण समितीच्या शुद्ध पाणी दान उपक्रमाचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त केली.सदरहु संस्था नित्य रुग्ण व त्यांचे नातलगांना पाणी देवुन रुग्ण सेवा घडवित आहेत इतकेच नाही तर पाणी दानाच्या या उपक्रमाला वेळाेवेळी पाणी दाते उत्तम प्रतिसाद देत आहे .ही संस्था मानवहित व रुग्ण सेवा जपत असल्याचे मत अनेकांनी या वेळी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केले .आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब घाडगे, प्रयोग शाळेतील लहु कोळी,दैनिक लोकप्रशासनचे संपादक क्षिरसागर, परिचारक शेख परिचारिका कोकाटे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ. लतिफ अ .मजीद, गणेश रानबा वाघमारे संजय गजधने,सचीन चौधरी, रमेश गंगावणे,विजय सपकाळ, शुद्ध पाणी पुरवठा करणारे शिवाजी वाघाळे, सुरक्षा गार्ड,अन्य उपस्थित होते.अ.लतिफ अ. मजीद यांनी रुग्ण कल्याण समिती तर्फे पाणी दान उपक्रमाची माहिती या कार्यक्रमातुन दिली तर संजय गजधने यांनी पाणी दाते व इत्तर उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.पाण्याचा अपव्यय टाळा,कोरोना जैविक विषाणु संसर्गाचे गांभिर्य ओळखून शासनाच्या नियमांचे वेळाेवेळी काटेकाेर पणे पालन करा व नियमित मास्क वापरा असे आवाहन देखिल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.