राजुरा नगरपरिषदेने निवडणुकीचे वेध लक्षात घेता शहरात लावलेले बाक ठरत आहे डोकेदुखीचे कारण
निकृष्ट दर्जाचे बाक लावुन जनतेच्या पैशांची उधळपट्टी
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांची चौकशीची मागणी
राजुरा/सविस्तर वृत्त असे की राजुरा नगर परिषद अंतर्गत नगरसेवकांचा व नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ आता लवकरच संपत आलेला आहे व नव्याने पुन्हा आता सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार हा दृष्टिकोन समोर ठेवून सध्या सत्तेमध्ये असलेल्या नगर परिषदेने विविध कामांना सुरुवात केलेली आहे. या मध्येच शहरांमध्ये ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करणे ,तसेच अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, शहरांमध्ये दिशा सूचक व मार्ग सूचक फलक लावणे ,तथा लोकांना बाहेर बसण्याकरिता सिमेंटचे बाक लावलेले आहेत. परंतु यामध्ये दोन गोष्टी सत्ताधार्यांना डोकेदुखी ठरलेल्या आहेत.
राजुरा शहरामध्ये जे सिमेंटचे बाक लावलेले आहेत त्याचे बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे झालेले आहे की ते आपोआपच तुटत आहेत, तथा साधे लहान मुले त्यावर उभी जरी झाली तरी त्यांना भेगा जाऊन त्यांचे तुकडे पडत आहेत. असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे साहित्य वापरून हे बाक बनविण्यात आले असे सिमेंटचे साहित्य सत्ताधाऱ्यांनी आपले घर बनवताना किंवा भविष्यामध्ये जर ते स्वतः वैयक्तिक रित्या कुठले बांधकाम करतील तर ते वापरतील का ? असा बोचक सवाल देखील त्यांनी एका पत्रकामध्ये केला आहे .
सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीचे वेध लक्षात घेता जनतेची सेवा करण्या करीत केलेला फसवा केविलवाणा प्रयत्न आहे. असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी सत्ताधारी नगरपरिषदेतील लोकांनी जनसामान्यांचा पैसा हा वाया घालविला असून यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. व त्याची चौकशी करण्याची मागणी सुरज ठाकरे यांनी केली आहे.
याशिवाय राजुरा शहरांमध्ये शहरभर मार्ग सुचक स्टील सारखे वाटणारे फलक लावण्यात आले. परंतु या मध्येच देखील घोळ झाल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे. या फलकाचा वापर राजुरा मध्ये दाखल होणाऱ्या रस्त्यांवर आमदार व नगराध्यक्ष यांनी स्वतःचे फोटो लावून खाजगी उपयोगाकरिता केला आहे. सामान्य जनतेचा पैसा हा खाजगी उपयोगकर्ता वापरणे हे बेकायदेशीरच आहे. असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे. सदर स्वागत फलकांवर स्वतःचे फोटो लावण्याचा अधिकार कुठल्या ठरावा अंतर्गत अथवा कुठल्या कायद्याअंतर्गत नगराध्यक्ष व आमदार यांना देण्यात आला याची विचारणा त्यांनी नगरपरिषदेला केली आहे. जनसामान्यांचा पैसा हा अशाप्रकारे स्वतःच्या नाव लौकीका करिता वापरणे हे अयोग्यच आहे. याशिवाय राजुरा नगर परिषद मध्ये एक ना अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आहेत हे भविष्यामध्ये जनतेसमोर आणू असे एका पत्रकात सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे.