मुकुटंबन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
पत्रकारांना शिवीगाळ प्रकरणी न्यूज असोसिएशन संघटने तर्फे ग्रामपंचायत ला निवेदन
प्रतिनिधी । झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत मानली जाते तेथिल लोकसंख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात नेमले गेले आहे. मात्र काही मुजोर ग्रामपंचायत कर्मचारी पत्रकारांना शिवीगाळ करण्याचा एक प्रकार मुकुटंबन ग्रामपंचायत हद्दीत घडला.संकेत गजानन गझलवार (पत्रकार) हे पाणी आणण्यासाठी गादेवार चौक मध्ये पाणी फिल्टर लावून असल्या ते गेले असता. तेथील फिल्टर बंद अवस्थेत आढळून आले. संकेत ने ग्रामपंचायत मुकुटंबन चे सरपंच मीना आरमुरवार यांना फोन केला असता त्यांनी असे म्हटले की, मी एका कर्मचाऱ्यांना पाठवत आहे. तो प्रॉब्लेम पाहून घेईल असे सांगितले. मात्र तिथे आलेल्या मुजोर कर्मचारी सुनील आरमुरवार याने सरपंच ला फोन केला म्हणून पत्रकार संकेत गझलवार यांना अशलिल भाषेत शिवीगाळ केली. यावरून काही प्रमाणात ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार समोर येत आहे.ग्रामपंचायत मध्ये बरोबर कर्मचारी उपस्थित राहत नाही. कोरोना काळातील ग्रामपंचायत ने ग्राम दक्षता समिती ची देखील निवड अजून केली नाही. कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारचे नियोजन करताना दिसत नाही आहे.फक्त पावती बुक घेऊन बाजारात वसुली साठी फिरतांना दिसतात. ग्रामपंचायतच्या कार्यालयीन कामकाजाबाबत अनेक समस्या नागरिकांना त्रासदायक ठरताना दिसत आहे. मात्र त्या मुजोर कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काय धडा शिकवेल हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच आशयाचे निवेदन न्यूज असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया च्या माध्यमातून ग्रामपंचायत ला देण्यात आले व अशा दारू पिऊन येणाऱ्या कर्मच्याऱ्यांना निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत च्या कोणत्याही कर्मचारी व सद्स्य यांनी यापुढे असे गैरप्रकार केल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे व दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी संकेत गझलवार, गणेश मुद्दमवार, संघर्ष भगत, जयंत उदकवार, पुरूषोत्तम गेडाम इत्यादी निवेदन देतांना उपस्थित होते.