दारु तस्करांच्या विरुध्दात चंद्रपूरात पाेलिस विभागाच्या धडक कारवाया
चंद्रपूर, किरण घाटे – विदर्भात कामगार जिल्हा म्हणून आेळख असणां-या चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने काही वर्षापुर्वी दारुबंदी केली असली तरी शहरासह जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारु येत असल्याचे दिसून येते .दरम्यान अश्या दारु तस्करां विरुध्दात चंद्रपूर जिल्ह्यातील पाेलिस खात्याने धडक माेहीम राबवित जाेमाने कारवायां सुरु केल्या आहे .नित्य जिल्ह्यात कुठे ना कुठे पाेलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाया करीत आहे .अश्यातच चंद्रपूरचे विद्यमान पाेलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शना खाली पाेलिस विभागाने शहरातील पाच दारु तस्करांवर नुकत्याच कारवाया केल्या आहे .विशेष म्हणजे चंद्रपूर नगरीतील गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे सह त्यांच्या पाेलिस पथकाने पाच दारु तस्करांना गुप्त माहितीच्या आधारे रंगेहात पकडुन त्यांना ताब्यात घेतले असल्याचे व्रूत्त आहे .या धडक कारवायांत एकंदर साेळा लाखांचा माल जप्त करण्यांत आला असुन चंद्रपूर शहरातील विविध भागात या दारु तस्कारांवर कारवायां केल्या आहे . अवैध दारु विक्रेत्यांवर अंकुश लावण्यासाठी पाेलिस खाते नेहमीच प्रयत्नशिल असतात परंतु या उपरही अवैध दारु विक्रेते आपले डाेके वर काढुन अवैध दारुची तस्करी करण्यांत विविध प्रकारचे मार्ग शाेधत असतात .काही का असाे ना पाेलिस विभागाने या केलेल्या कारवायांमुळे शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अवैध दारु विक्रेत्यांचे अक्षरशा धाबे दणाणले हे मात्र खरे आहे .