ब्रेकिंग न्युज!!!
अखेर प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन अमृत भवन चौकात खुलेआम दारूचा भरला बाजार
प्रशासन कारवाई करणार काय? जनतेचा सवाल
वणी/प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्ह्यात टाळेबंदी व संचारबंदीचे कडक निर्बंध लागू असतांना मात्र वणी मध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. कारण दारु विक्रेत्यांना घरपोच (होम डिलेवरी) चे आदेश असतांना मात्र दारुच्या (वाईन शॉप) दुकानात किंवा दुकानाबाहेर दारुची खुलेआम दारू विक्री करण्यात येत आहे.
दरम्यान आज दि.२२ मे ला सकाळी ७ वाजता पासुनच येथिल दारुबंदी विभागाच्या नाकावर टिच्चुन शॉम टॉकीज जवळील अमृत भवन, डॉ.अब्दुल हमीद चौकात खुलेआम गर्दी करुन व भर रस्त्याने दारुच्या पेट्या आणुन दारु विक्रीचा बाजार भरला आहे.
पार्थ वाईन शॉप हे नेहमीच सरकारचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करते. मात्र यांच्यावर कोणतीच कारवाई प्रशासनाकडून का केली जात नाही हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो? जिल्हाधिकारी यांनी वणी पोलिसांना किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाई करण्यास सूचना का देत नाही किंवा पार्थ वाईन शॉप चा परवाना रद्द का करत नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा नियम तोडून विक्री केली जात आहे. मात्र कारवाई होत नाही ? असा प्रश्न येथील सामान्य जनतेला पडला आहे.