नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात

0
830

नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात

चंद्रपूर, दि. 20 मे : वरोरा तालुक्यातील पिचदुरा या गावातील 28 वर्षीय युवक प्रशांत गौरकार याला किडनीचा गंभीर आजार झालेला होता,प्रशांतच्या वडिलांनी प्रशांतच्या उपचारासाठी आपल्या ऐपतीनुसार भरपूर प्रयत्न केले,दोन अपत्यांपैकी एक आधीच वेडसर असल्याने आणि घरातील कमावता मुलगा प्रशांतही आजारी पडल्याने ते अत्यंत द्विधा मनस्थितीत सापडले,घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांकडे उपचारासाठी पैशाची तजवीज होत नव्हती,आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी इकडे तिकडे कर्ज घेऊन उपचार सुरू ठेवला,प्रशांतचा उपचार ग्रामीण रुग्णालय वरोरा येथे सुरू होता परंतु त्याला वाचविण्यासाठी एका चांगल्या खाजगी दवाखान्याची गरज होती,प्रशांतची माहिती नाते आपुलकीच्या एका सदस्याला माहीत झाली तेंव्हा त्यांनी संस्थेच्या सदस्यांसमोर प्रशांतला मदत करण्यासंबंधी विषय ठेवला,त्या विषयावर संस्थेच्या सदस्यांमध्ये चर्चा होऊन प्रशांतच्या उपचारासाठी संस्थेतर्फे 20 हजार रुपयांची मदत करण्याचे ठरले त्याचवेळी चंद्रपूर येथील सामाजिक भान जपणारे डॉ.सचिन धगडी यांच्याकडे प्रशांतला दाखवून बघा अशी सूचना केली.त्यानुसार प्रशांतचे वडील श्री.वासुदेव गौरकार यांनी प्रशांतला डॉ.धगडी यांच्याकडे आणले.डॉ.धगडी यांचे कोव्हीड हॉस्पिटल असल्याने त्यांनी त्याला भरती न करता तपासणी करून चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात पाठवले परंतु माणुसकी नावाची एक गोष्ट असते ती प्रकर्षाने त्यांच्या व्यवहारातून जाणवली जेंव्हा त्यांना माहीत झाले की प्रशांतची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि नाते आपुलकीचे संस्था त्याला मदत करत आहे तेंव्हा त्यांनी प्रशांतकडून कसलीही तपासणी रक्कम घेतली नाही उलट प्रशांतला आर्थिक सहाय्य केले.नाते आपुलकीचे संस्था जशी आपुलकीने नाते जपत येत आहे अगदी त्याचप्रकारे डॉ.सचिन धगडी देखील सामाजिक दायित्व जपत आहेत याची नोंद येणारा काळ नक्की घेईल यात शंका नाही.
प्रशांतला मदत करण्यासाठी संस्थेचे सचिव प्रा.प्रमोद उरकुडे,उपाध्यक्ष किशन नागरकर, सहसचिव महेश गुंजेकर यांनी प्रामुख्याने डॉ.धगडी यांच्या दवाखान्यात जाऊन प्रशांतचे वडील श्री.वासुदेव गौरकार यांना डॉ.धगडी यांच्या हस्ते प्रस्तुत रकमेचा धनादेश दिला.कोरोनाच्या कठीण काळात देखील नाते आपुलकीचे संस्था आपले सामाजिक कार्य अविरतपणे करत आहे,समाजातील गरजवंत लोकांपर्यंत धावून जात आहे,खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत आहे असे मनोगत डॉ.धगडी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here