खरिपाच्या हंगामात कृषी केंद्राना तसेच लग्न समारंभासाठी १५ ते २० लोकांची परवानगी द्या-माजी आमदार प्रा. राजु तिमांडे
धान्य वितरण, भाजीपाला व फळे यांचे वेळापत्रक तयार करून सुरू ठेवावे
हिंगणघाट:-अनंता वायसे तालुका प्रतिनिधी १८ मे २०२१
खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खते घेण्यासाठी कृषी केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच लग्नसमारंभासाठी १५ ते २० लोकांची परवानगी देऊन कडक निबंधात बदल करण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार ,जिल्हाधिकारी वर्धा व निवासी जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी वर्धा यांनी कडक निर्बंधांना १ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये काढलेल्या आदेशात तातडीने अंशता बदल करून कृषी केंद्र, लग्न समारंभ, हातगाडी वर विकणारे भाजीपाला फळे, शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे, पेट्रोल पंपावरील डिझेलचा वाटप, धान्य वितरण प्रणाली, शेतकऱ्यांचा माल विकण्याबाबत निर्बंध शिथीळ करून जनतेला दिलासा द्यावा.
जिल्हाधिकारी यांनी १३ मे पर्यंत लॉकडाउन करून कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर पुन्हा १८ मे पर्यंत लागू करून संचारबंदी केली होती आणि दिनांक १६ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांनी आदेश काढून १ जून २०२१ पर्यंत संचारबंदीला मुदतवाढ दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. हंगामाच्या तोंडावर बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना माल विकून पैसा उभा करता येत नाही. त्यामुळे खरिपाच्या हंगामात बी-बियाणे विकत घेण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचे पीक शेतात सडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
खरिपाच्या हंगामासाठी शेतीची कामे सुरु झाल्यामुळे ट्रॅक्टर चालविण्यासाठी डिझेलची आवश्यकता असून पेट्रोल पंप सुरू ठेवणे नितांत आवश्यक आहे.
लग्नसमारंभासाठी १५ ते २० लोकांची परवानगी देण्यात यावी तसेच धान्य वितरण प्रणालीसाठी वेळापत्रक देण्यात यावे.
तरी जनतेचे हित व अडचण लक्षात घेता कृषी केंद्राची दुकाने सुरू ठेवण्यात यावे ,लग्न समारंभाला परवानगी देण्यात यावी ,धान्य वितरण प्रणालीचे वेळापत्रक तयार करण्यात यावे, बाजार समित्या सुरू करण्यात याव्यात, वार्ड-वार्डात भाजीपाला व फळांचे हातगाडी ठेले सुरू ठेवण्यात यावे अशी सर्व मागण्यांसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी वर्धा तसेच निवासी जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे संचारबंदी मध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी केली आहे.