भाजपप्रणीत केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती बेसुमार वाढविल्याने केंद्रसरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली कडून तीव्र निषेध, आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
गडचिरोली, सुखसागर झाडे : देशात पेट्रोल, डीझेल च्या किमंती बेसुमार दररोज वाढत जात असुन त्यात गॅस सिंलेडरच्या सुद्धा किमंती वाढल्याने देशातील जनतेचे जनजीवन विस्कळीत होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
सध्या भाजप सरकार ने रासायनिक खतांच्या किमंती बेसुमार वाढ करून देशातील शेतकरी बांधवांच्या जिवन मुश्किल करून भांडवलदार यांचे पोट भरणे सुरू आहे. कोरोनांच्या महामारीत दोन वर्षां पासुन सामान्य जनता व शेतकरी उद्योग धंद्याविना मोलमजुरी विना भरडत असतांना.सततची नापिकी सदैव नैसर्गिक आपत्ती त्याच सोबत मिळालेल्या पिकांना योग्य हमी भाव न देता भाजपप्रणीत केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमंती बेसुमार वाढवून शेतकरी बांधवाचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली कडून निषेध आंदोलन करतांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगनजी जांभुळकर, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे महिला जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,कोषाध्यक्ष कबिर शेख, महिला शहराअध्यक्षा मणीषा खेवले, सा. न्याय विभाग उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, शहराअध्यक्ष विजय धकाते, शहर उपाध्यक्ष कपिल बागडे, कृणाल चिलगेरवार, मल्ल्या कालवा, शंकर दिवटे, चंद्रशेखर खंदरे, वैभव विंदे, देवाजी नरुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.