कढोली वासीयांनी प्रकाशित केला ‘प्राणवायू’ एक लहान चित्रपट
राजुरा, विरेन्द्र पुणेकर : कोरोनाचा संसर्ग चोही कडे धुमाकूळ घालत असताना जनतेला वेडो वेडी प्राणवायू व आरोग्य केंद्रात रुग्णांन साठी खाटा चा तुटवडा पडत असल्याने नागरिकांना योग्य तो उपचार योग्यवेळी मिडत नसल्याने सर्विकळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.याच बाबी लक्षात घेता काढोली वासीयांची मोठा उपक्रम हाती घेतला. प्राणवायू (एक लहान चित्रपट) हा एक लहानसा पण खूप महत्त्वाचा चित्रपट युट्यूब वरती प्रकाशित करून त्यात आपल्या अवती भवती प्राणवायूची कमतरता कश्यामुडे होत आहे. सोबतच जनतेला वृक्षा चे मौल वृक्ष लागवड व त्याची जोपासना करणे किती गरजेचे आहे. हे त्यांच्या अभिनयातून दाखवून दिले आहे.
प्राणवायू (एक लहान चित्रपट) यात मुख्य भूमिका साकारणारे श्री.शैलेश चटके- सदस्य ग्रा. पं काढोली (बूज) संतोष हिंगणे, किसन बोबळे, गणेश उडकूडे, महेश झाडे, चारुल मासपत्तीवार यांनी साकारला आहे.
प्राणवायू हा छोटा चित्रपट (किसन क्रीएशन – kisan Creation) ह्या युट्युब चैनल वरती पाहाता येईल.
ह्या कोरोना च्या प्रादुर्भावा मध्ये यांच्या अभिनयातून सकारात्मक विचार समोर येतोतो म्हणजे।।झाडे लावा झाडे जगवा।। झाडा विना आपले ही जीवन नाही.